Sunday, October 16, 2022

वनामकृवित आयोजित गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण प्रशिक्षणाचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या विद्यमाने “विविध पिकांचे गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण” या विषयावर एक आठवडीय राष्ट्रीय प्रशिक्षण दिनांक १० ते १५ ऑक्‍टोबर दरम्यान आयोजन करण्‍यात आले होते, दिनांक १५ ऑक्‍टोबर रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला.  

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे आभासी पध्दतीने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आणि विशेष अतिथी म्हणुन  शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले हे उपस्थित होते. कार्यक्रमास हैद्राबाद येथील भात संशोधन संस्‍थेचे विभाग प्रमुख डॉ. डी. सुब्रमण्यम, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. रघुवीरराव, आयोजक विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) डॉ. राजेश कदम, प्रशिक्षण समन्वयक डॉ. गोदावरी पवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, दर्जेदार पिकांसाठी गुणवत्तापुर्ण बियाणे व तंत्रज्ञान यांची नितांत गरज असते. त्या अनुषंगाने सदर प्रशिक्षण अतिशय महत्वाचे आहे. प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थी व शास्त्रज्ञ आपल्या संशोधन कार्यात करतील अशी आशा व्‍यक्‍त केली;

भाषणात डॉ. देवराव देवसरकर म्हणाले की, सोयाबीन व कापूस या पिकांत सुधारीत बीयाणे व त्यांची गुणवत्ता अतिशय महत्वाची असते. सोयाबीन या पिकामध्ये उगवण क्षमता हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बियाण्याची अनुवंशीक शुध्दता अतिशय महत्वाची आहे.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज  गोखले यांनी आपल्या मार्गदर्शनात आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून म्हणाले की, शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटीही म्हण प्रशिक्षणाच्या विषयामध्ये अतिशय योग्य आहे. बियाण्याची शुध्दता व प्रमाणिकरण कृषी क्षेत्रात अतिशय आवश्यक आहे.

डॉ. डी. सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात प्राप्‍त ज्ञानाचा उपयोग संशोधनात करण्‍याचा सल्‍ला दिला तर डॉ. पी. रघुवीरराव यांनी बियाणे, बियाण्याची गुणवत्ता अतिशय महत्वपुर्ण असल्‍याचे नमुद केले. आयोजक डॉ. गोदावरी पवार यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती देतांना म्‍हणाल्‍या की. प्रशिक्षणात राष्ट्रीय पातळीवरील बीजोत्पादन क्षेत्रातील नामांकित 30 शास्त्रज्ञांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले तर प्रशिक्षणासाठी 67 पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी प्रशिक्षणार्थी श्री. वसंत जाधव, कु. स्मिता देशमुख, मोहम्मदी बेगम, हनुमान कदम आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, प्रा. संजय पवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. संजय पवार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रविण वैद्य, डॉ. भारत आगरकर, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. मेघा जगताप, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विणा भालेराव, डॉ. एस. एस. फुलारी, डॉ. सुनिता पवार, प्रा. प्रितम भुतडा, डॉ. श्याम गरुड, डॉ. विशाल इंगळे तसेच नाहेप प्रकल्पातील कर्मचारी डॉ. हेमंत रोकडे, इंजी. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. श्वेता सोळंके, इंजी. शिवानंद शिवपुजे, डॉ. शिवराज शिंदे, अब्दुल बारी, इंजी. पौर्णिमा राठोड, इंजी. संजीवनी कानवटे, इंजी. अपुर्वा देशमुख, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. तनजीम खान, श्री. प्रदीप मोकाशे, श्री. रामदास शिंपले, श्री. नितीन शहाणे, मुक्ता शिंदे, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने यांनी परिश्रम घेतले.