Friday, October 7, 2022

विक्रमी वेळेत वनामकृवित शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली कार्यान्‍वीत

शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात येणार सुसूत्रता.....कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली दिनांक ७ ऑक्‍टोबर रोजी कार्यान्‍वीय करण्‍यात आली. सदर प्रणालीचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ आर सी अग्रवाल हे होते तर भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेतील संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ सुदिप मारवाह, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, आयटी सल्‍लागार डॉ आर सी गोयल आदीसह सर्व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्‍दतीने उपस्थित होते. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली मुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार असुन विविध शैक्षणिक प्रक्रिया स्‍वयंचलित होणार आहेत. यामुळे विद्यापीठाच्‍या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असुन वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे. यात अभ्‍यासक्रम व्‍यवस्‍थापन, विद्यार्थी व्यवस्‍थापन, विद्याशाखा व्‍यवस्‍थापन, ई लर्निंग आणि ऑनलान शुल्‍क संकलन याचा समावेश असुन यामुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्‍यासक्रम राबविण्‍यास मोठा हातभार लाभणार आहे.

मार्गदर्शनात उपमहासंचालक (शिक्षण) डॉ आर सी अग्रवाल म्‍हणाले की, माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनात परभणी कृषि विद्यापीठात ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली केवळ एक महिन्‍याच्‍या आत प्रभावीपणे कार्यन्‍वयीत करण्‍यात आली आहे. यामुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यास गती प्राप्‍त होणार आहे. सदर प्रणालीची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार असुन देशातील कृषि शिक्षणाचे डिजिटलायझेशन करण्‍यात येणार आहे.

डॉ सुदिप मारवाह म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली लागणारी माहिती कमी वेळेत अत्‍यंत अचुकपणे भरून प्रणाली कार्यान्‍वतीत केली, प्रणाली मुळे सर्व शैक्षणिक कार्य वेळेत पुर्ण होऊन विद्यार्थ्‍यीचे विविध अभ्‍यासक्रमातील प्रवेशापासुन ते पदवी अभ्‍यासक्रम पुर्ण होई पर्यंत सर्व माहिती प्रणालीत अद्यायावत होणार आहे,  याचा लाभ विद्यार्थ्‍यांना होणार आहे. 

मनोगतात डॉ आर सी गोयल यांनी सदर प्रणाली योग्‍यरित्‍या राबविण्‍याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन नोडल ऑफिसर डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्य डॉ बी एम ठोंबरे, प्राचार्य डॉ जहागिरदार, प्राचार्य डॉ भगवान आसेवार, प्राचार्य डॉ संजीव बंटेवाड, प्राचार्य डॉ राकेश अहिरे, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते. तांत्रिक सत्रात आयटी प्रोफेशनल श्री विभोर त्‍यागी, श्रीमती रजनी गुलीया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ गजानन भालेराव, डॉ संतोष फुलारी, डॉ मिलिंद सोनकांबळे, डॉ गोदावरी पवार, भरत हिंगणे, डॉ शिवराज शिंदे, संजीवनी कानवते, नितीन शहाणे, विश्‍वप्रताप जाधव, अनिकेत वाईकर, मारूती रणेर, जगदिश माने आदीसह नाहेप प्रकल्‍पातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व घटक महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचारी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्‍दतीने मोठया संख्‍येने उपस्थित होते.

सदर ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली भारतीय कृषि सांख्यिकी संशोधन संस्‍थेमधील नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन देशातील संपुर्ण कृषि विद्यापीठात राबविण्‍यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रक्रियांचे स्वयंचलितकरण होणार असुन यामुळे प्राध्‍यापक व कर्मचारी यांची वेळेची आणि श्रमाची बचत होऊन प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्‍यास मदत होणार आहे. विद्यार्थ्‍यांनाही योग्‍य पध्‍दतीने विविध सेवा पुरविण्‍यास विद्यापीठास हातभार होणार आहे. प्रणालीद्वारे विविध राज्य कृषी विद्यापीठातील शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्‍ध होणार आहे, यामुळे विविध शैक्षणिक धोरण व योजना राबविण्‍यासही मदत होईल. यात अभ्यासक्रम व्यवस्थापन, विद्यार्थी व्यवस्थापन, विद्याशाखा व्यवस्थापन, प्रशासन व्यवस्थापन, ई-लर्निंग, ऑनलाइन शुल्क संकलन आदीचा समावेश आहे. वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या एकुण बारा घटक महाविद्यालयाचा समावेश करण्‍यात आला असुन सर्व पदवी अभ्‍यासक्रम, प्राध्‍यापक आणि विद्याथ्‍र्यांची माहिती यात अद्यायवत करण्‍यात आली आहे.


News in English .....

Academic Management System (AMS) launched by VNMAU in record time

AMS will improve the academic efficiency of the University by saving time and efforts ..... Vice-Chancellor Dr. Indra Mani

Vasantrao Naik Marathwada Agricultural University (VNMAU, Parbhani) was launched online Academic Management System (AMS) developed by ICAR-IASRI under NAHEP Component-2 project on 7th October 2022. Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of the University was inaugurated the system and Dr. R.C.Agrawal, DDG (Education), ICAR, New Delhi was attended the function as a chief guest. Whereas the other dignitaries Dr. Sudip Marwaha, Head, Division of Computer Applications, IASRI, New Delhi; Dr. D.N. Gokhale, Director of Instruction, Dr. R.C. Goyal, IT Consultant and Associate Deans from constituent colleges were attended the function both online and offline mode.

Hon'ble VC Dr. Indra Mani stated in his presidential address that the online Academic Management System (AMS) will streamline the university's academic work and automate various academic activities. This will increase efficiency and transparency in university education system and save time and effort. The AMS includes curriculum management, student management, faculty management, e-learning and online fee collection. It will be extremely beneficial in implementing the curriculum outlined in the new National Education Policy (NEP 2020).

DDG (Education) Dr. R.C. Agrawal stated in his remarks that the AMS effectively implemented in VNMKV within record time under the close supervision of Hon'ble Vice-Chancellor Dr Indra Mani. This will expedite the university's academic work. The system's scope will be expanded, and in coming future whole agricultural education in the country will be digitized.

Dr. Sudip Marwaha said that, the VNMKV implemented the AMS by accurately filling out the required information in a short period of time. Because of the system, all educational work will be completed in time, and the entire process from admission upto the completion of the degree will be updated in the system. Students will benefit from this system.

In his introductory remarks Dr. D.N. Gokhale mentioned the efforts taken by the University for AMS. The programme hosted by Nodal Officer Dr. R.V. Chavan and Dr. P.S. Kapse proposed vote of thanks. The program attended by Associate Dean Dr. Syed Ismail, Dr. U.M. Khodke, Dr. Jaya Bangale, Dr. G.M. Waghmare, Dr. B.M. Thombare, Dr. B.V.Asewar, Dr. J.E. Jahagirdar, Dr. S.D. Bantewad, Dr. R.D. Ahire, Head (Extn. Edu.) Dr. R.P. Kadam. Faculty members of the university were also attended the programme online and offline mode.