Monday, October 3, 2022

वनामकृवित विस्तार कार्यकर्त्यांकरिता रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान विषयी निवासी प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान यावर दिनांक २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाले. सदरील प्रशिक्षणात मराठवाडातील लातूर आणि औरंगाबाद कृषि विभागातील आठही जिल्ह्यातील कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक पदावरील ४० विस्तार कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रशिक्षणात रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाविषयी विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. यात रब्बी ज्वारीचे वाण यावर ज्वार पैदासकार डॉ.लक्ष्मण जावळे, ज्‍वार लागवड तंत्रज्ञानावर ज्वारी विद्यावेत्ता प्रा.प्रितम भुतडा, खत आणि पाणी व्यवस्थापनावर विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, तण व्यवस्थापनावर कृषि विद्यावेत्ता डॉ. सुनिता पवार, रोग व्यवस्थापनावर पिक रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रम घोळवे, कीड व्यवस्थापनावर सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, रब्बी ज्वारीचे मूल्यवर्धन यावर सहाय्यक प्राध्यापक डॉ. मधुमती कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले. तसेच सध्या परिस्थितील कीटकनाशकांचा सुरक्षित वापर आणि घोणस अळी व्यवस्थापन याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

प्रात्यक्षिकातंर्गत ज्वार संशोधन केंद्र, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) याठिकाणी भेट देऊन विद्यापीठामध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदरील प्रशिक्षण रामेती, औरंगाबाद तर्फे प्रायोजित होते, रामेती औरंगाबाद चे प्राचार्य डॉ.अभयकुमार पडिले, सहाय्यक संचालक श्री.एम.एस.गुळवे, कृषी पर्यवेक्षक श्री.एम.एन.सिसोदिया, श्री.डी.आर.करांडे, श्री.भगवान वाकडे यांनी आयोजन केले होते. प्रशिक्षण यशस्वितेसाठी श्री. मधूकर मांडगे, श्री.डिगांबर रेंगे, श्री.ज्ञानेश्वर माहोरे, श्री.नितीन मोहिते, श्री. पांडुरंग डिकळे, शेख साजीद आदींनी परीश्रम घेतले.