Monday, February 19, 2024

वनानाकृवित छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी

शिवजयंतीमुळे वर्षभर कार्य करण्याची ऊर्जा मिळते ...... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि हे होते, त्‍यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि शुभेच्छा देऊन म्‍हणाले की, शिवजन्मोत्सव साजरा केल्यामुळे आपणास वर्षभर कार्य करण्याची ऊर्जा मिळते. मोठे काम करण्यासाठी वयाची अट नसते, शिवाजी महाराजांनी त्यांच्या तेराव्या वर्षाच्या वयामध्येच स्‍वराज्‍य स्‍थापनेचे कार्य सुरू केले होते. शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि विक्रम सर्व सामायिक सर्व जण हिताय आणि सुखाय होते. ३९४ व्या वर्षातही संपूर्ण जग सुद्धा त्यांचा इतिहास लक्षात ठेवतो यात सर्वकाही आहे. शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न होते.महाराजांच्या कार्यपद्धतीचे आचरण आणि अनुकरण करण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी ज्ञानेश्वर कटिंग यांनी तर आभार डॉ. आशा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ.  सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.  विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यापीठ उपअभियंता डॉ. डी. डी. टेकाळे,  विविध विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.