Friday, February 2, 2024

वनामकृविच्‍या वतीने काढण्‍यात आला संदल

एकात्‍मतेचे प्रतिक असलेला परभणी येथील प्रसिध्‍द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्‍या ऊरूसानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्‍यात आला. संदलचा प्रारंभ कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी विद्यापीठातील कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.