सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि परभणी पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रमास दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता विद्यापीठाच्या शेतकरी भवन येथून प्रारंभ झाला. या
प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुभेच्छा देत
या उपक्रमाचे स्वागत केले. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री
रवींद्रसिंह परदेशी यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात केली.
या वेळी कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता
डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम,
अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुंजाळ तसेच विद्यापीठाचे आणि पोलीस दलाचे
अन्य अधिकारी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी म्हणाले की, आपला भारत देश
सुदृढ आणि फिट राहावा, तसेच कृषि आणि पोलीस दलातही फिटनेस
टिकवून समाजसेवेचे कार्य अधिक परिणामकारकपणे पार पाडावे, यासाठी
अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
या उपक्रमात पोलीस विभागाचे अधिकारी, प्राध्यापक, अधिकारी-कर्मचारी,
विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व सहभागीनी
राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व आणि देशभक्तीचा संदेश देत
विद्यापीठाच्या परिसरातून पदभ्रमण केले.
या कार्यक्रमाचा उद्देश देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश समाजापर्यंत
पोहोचविणे हा होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन “एक भारत, श्रेष्ठ भारत” या
संकल्पनेला चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या
विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व परभणी पोलिस विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

.jpeg)
.jpeg)



.jpeg)