वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सन
2014 कृषि दिनदर्शिकेचे विमोचन महिला शेतकरी मेळावादिनी बारामती येथील कृषि विकास
प्रतिष्ठानाच्या विश्वस्ता मा. श्रीमती सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात
आले, यावेळी प्रभारी कुलगुरु तथा शिक्षण संचालक डॉ. विश्वास शिंदे, महाराष्ट्र
राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आशाताई भिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक
ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी
अधिष्ठाता प्रा. विशाला पटनम, आत्माचे प्रकल्प संचालक
श्री अशोक काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री अप्पासाहेब चाटे आदी मान्यवर
उपस्थित होते. कृषि दिनदिर्शकेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण हे प्रकाशक आहेत
तर संपादन विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी केले असुन
श्री वाय. एस. सोनवणे यांनी संपादन सहाय्य केले आहे. सदर कृषि दिनदर्शिकेत
शेतक-यांना उपयुक्त अशी शेती विषयक शास्त्रोक्त माहिती, प्रत्येक महिन्यात
करावयाची शेतीची कामे, खताचा योग्य वापर, पिकाविषयी किड व रोग व त्यावरील उपाय
तसेच कै. वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांचे विषयी त्यांचे शेतीबद्दल व
शेतक-याविषयी प्रेम यावरील समर्पक असा लेख असुन सण, वार, धार्मिक यांची माहिती दिली
आहे. सदरिल कृषि दिनदर्शिका विस्तार शिक्षण विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी येथे
विक्रिसाठी उपलब्ध आहे.