Thursday, January 23, 2014

जगात देश महिला अत्‍याचारात चौथ्‍या क्रमांकावर...... मा डॉ आशाताई मिरगे



जगात देश महिला अत्‍याचारात चौथ्‍या क्रमांकावर असुन महिलांनी ठरविल्‍यास महिलावरील अत्‍याचार कमी होऊ शकतात, असे प्रतिपादन राज्‍य महिला आयोगाच्‍या सदस्‍या मा डॉ आशाताई मिरगे यांनी केले, त्‍या परभणी जिल्‍हा पोलीस दल व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या वतीने संयुक्‍त विद्यमाने आयोजित युवतींच्‍या समस्‍यांवर आधारीत गर्भापासुन सरणापर्यंत याविषयावरील व्‍याख्‍याना प्रसंगी बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा पोलीस अधिक्षक मा श्री संदीप पाटील हे होते तर प्रमुख अथिती म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, सहायक पोलीस अधिक्षक श्री अशोक प्रणव, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पटणम,  नुतन महिला महाविद्यालयाचे डॉ अविनाश सरनाईक, शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम टी मुलगीर व शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
      त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, युवतींना स्‍त्री भ्रुण हत्‍या, बालविवाह, जन्‍मभर असमानता, हुंडाबळी, कौटुंबिक हिसांचार याचा आयुष्‍यभर सामाना करावा लागतो. अनेक कायदे, यंत्रणा निर्माण केल्‍या तरी हे अत्‍याचार कमी होणार नाहीत, त्‍यासाठी प्रत्‍येक स्‍त्रीने निश्‍चय केला पाहीजे. संसार जपत महिलांना या अत्‍याचारास विरोध करता आला पाहिजे. महिलांना आपला हक्‍क गाजवायचा आहे, परंतु पुरूष दुश्‍मन झाले नाही पाहिजे याची काळजी घावी लागेल. याप्रसंगी त्‍यानी कौटुंबिक अत्‍याचार कायदा 2005 तसेच विविध स्‍त्री सुरक्षेसाठीच्‍या कायदयाची माहिती दिली. 
      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ अनुजा डावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस अधिकारी श्री जैतापुरकर यांनी केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यींनी, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.