कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात राजमाता जिजामाता व
स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त युवक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके तर व्यासपीठावर
महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष प्रा. विवेक भोसले व विविध विभागाचे
विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना
प्राचार्य खोडके म्हणाले, स्वामी विवेकानंदानी जगाला दिलेल्या मुल्यांचे अनुकरण
प्रत्यक्ष क़ृतीतून अवलंब करणे गरजेचे आहे स्वामी विवेकानंदानी शिकागो येथील
धर्मसंसदेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करुन युवा पिढी सक्षम बनविण्याकरीता त्यांचे
विचार अंगीक़त करण्याचे आवाहन त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले. मॉ
जिजामाता यांच्या सारख्या आदर्श मातांची आज देशाला गरज असल्याचेही त्यांनी
सांगितले.
याप्रसंगी कु. जान्हवी जोशी, कु.
मयुरी काळे, प्रसन्न पवार, इंद्रजीतसिंग, उमेश राजपुत, नवनाथ घोडके आदी
विद्यार्थ्यांनी युवक दिनानिमत्त आपले विचार मांडले. देशाच्या सामाजिक आर्थिक
व राजकीय उत्थानासाठी सर्व युवकांनी एकत्रितपणे पुढे येवून राष्टीय विकास साधावा
असा द़ढ निश्चय करण्याचे विद्यार्थ्यांनी मान्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अभयसिंह
पवार याने केले, तर आभार प्रदर्शन अनंता हांडे याने केले. कार्यक्रमाच्या
यशस्वितेकरीता रामेश्वर वाघ, धनराज जाधव, अक्षय काकडे, ओंकार देशपांडे या
विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.