गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली दरम्यान औरंगाबाद येथील जैन स्पाईसेस फॅक्ट्रीच्या
भेटी प्रसंगी प्रा डॉ शंकर पुरी, डॉ जयश्री रोडगे व विद्यार्थ्यी
|
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या गृहविज्ञान
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक सहलीचे आयोजन दिनांक 11 ते 13 जानेवारी दरम्याण करण्यात
आले होते. विद्यार्थ्याचे शैक्षणिक, औद्यागिक, संशोधनात्मक तसेच संवाद कौशल्य व बाजार व्यवस्थापन याबाबतचे
ज्ञान वृंघ्दिगत होण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणुन मराठवाडा विभागातील
विविध स्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यात औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषि
संशोधन प्रकल्प, फळ
संशोधन प्रकल्प, श्री
शिवाजी संग्रहालय, अंकुर
अॅपरल, जैन स्पाईसेस, नेक्सट फर्निचर, खुलताबाद येथील पैठणी व हिमरू
शाल हातमाग केंद्र, पैठण
येथील हायड्रोपावर प्रकल्प, तसेच कॉटन जिनींग व ऑईल मिल आदी ठिकाणी भेटी दिल्या. या शैक्षणिक
सहलीचे नियोजन गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पटणम
यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा डॉ शंकर पुरी व डॉ जयश्री रोडगे यांनी केले.