Friday, January 17, 2014

कृषि अभियंत्यांना कृषि यांत्रिकीकरणाच्या संशोधन व व्यवसायात मोठी संधी ......जॉनडिअरचे वरिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी श्री. ए. राजशेखर


कृषि अभियंत्‍यांना कृषि यांत्रिकीकरणाच्‍या संशोधन व व्‍यवसायात मोठी संधी असुन कृषि यांत्रिकीकरण क्षेत्रात कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी कृषि यंत्रे व औजारे निर्मितीमध्‍ये पुढे येवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन जॉनडिअर कंपनी वरिष्‍ठ तंत्रज्ञ अधिकारी श्री. ए. राजशेखर यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास दि. 17 जानेवारी 2014 रोजी कृषि यांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्‍टी्य पातळीवरील अग्रगण्‍य जॉनडिअर इंडिया कंपनीचे वरिष्‍ठ तंत्रज्ञ अधिकारी श्री.ए.राजशेखर, श्री. पंकज व श्री. विनायक बोरांगे यांनी भेट दिली. महाविद्यालयाच्‍या व्‍यवसाय सल्‍ला मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ.यु.एम.खोडके होते.
     याप्रसंगी त्‍यांनी जॉनडिअर कंपनीतर्फे कृषि अभिंयात्‍यासाठी आयोजीत देशपातळीवर टेक्‍नोचॅम्‍प 2014 स्‍पर्धाबाबत माहिती दिली. स्‍पर्धेचे नियम, अटी व कृ‍षि यांत्रिकीकरणातील सध्‍याची आव्‍हाने यांचे कंपनीतर्फे सादरीकरण करण्‍यात आले. कृषि यांत्रिकीकरणामध्‍ये तरुण संशोधकांना संधी मिळावी व त्‍यांच्‍या संशोधन कल्‍पना साकार व्‍हाव्‍या या उद्देशासाठी हया स्‍पर्धचे आयोजन करण्‍यात आले असुन स्‍थानिक पिक पध्‍दतीच्‍या गरजा लक्षात घेवून क़षि औजारे निर्मितीबाबत आपल्‍या संकल्‍पना मांडण्‍याची संधी कृषि अभियांत्‍याना मिळणार आहे, यात विद्यार्थ्‍यांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन जॉनडिअरच्‍या अधिका-यांनी केले. तसेच प्रत्‍यक्ष चर्चेद्वारे विद्यार्थ्‍यांची संशोधन दृष्‍टी व विचार पडताळून पाहिले.
कृषि क्षेत्राच्‍या प्रगतीमध्‍ये भविष्‍यात कृषि यांत्रिकीकरणावर जास्‍त भर राहणार असुन कृषि यांत्रिकीकरणातील आव्‍हाने पेलण्‍यासाठी कृषि अभियंत्‍यांनी पुढे येण्‍याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्‍याना आवश्‍यक मार्गदर्शन महाविद्यालयाकडून करण्‍यात येईल, असे आश्‍वासन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ.यु.एम.खोडके यांनी दिले. या निमित्‍ताने जॉनडिअर कंपनीतर्फे देशपातळीवर उत्‍कृष्‍ठ कृषि अभियंते निवडण्‍यासाठी या महाविद्यालयामध्‍ये निय‍मीतपणे व्‍यवसाय मार्गदर्शन व निवड मुलाखती आयोजीत करण्‍यात येतील असे अधिका-यांनी स्पष्‍ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाचे व्‍यवसाय मार्गदर्शन व सल्‍ला केंद्राचे अधिकारी डॉ.जी.यु.शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. पोटेकर, प्रा. आवारी, प्रा. भुईभार, डॉ. स्‍मीता खोडके, प्रा. मुंडे, प्रा. जाधव, प्रा.शिंदे, प्रा. टेकाळे, प्रा. राउतमारे, श्री. राउत व विद्यार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला.