|
चिकलठाणा येथे मार्गदर्शन करतांना प्रा विशाला पटनम |
|
ढेंगळी पिंपळगावाच्या महीलांना मार्गदर्शन करतांना डॉ जयश्री झेंड |
|
निपाणी टाकळी येथे मार्गदर्शन करतांना डॉ प्रभा अंतवाल |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या
गृहविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या 'गृहविज्ञान आपल्या दारी:
कुटुंबाचे कल्याण करी' या अभिनव उपक्रमाच्या दुस-या टप्प्याची सुरूवात सेलु
तालुक्यातील ढेंगळी पिंपळगांव, निपाणी टाकळी व चिकलठाणा या गावापासुन दि 04
जानेवारी 2014 रोजी झाली. चिकलठाणा येथे प्रा विशाला पटनम यांनी 'बाल विकास व
शैक्षणिक संपादणुकीसाठी कानमंत्र' व 'माता व बाल मृत्यूदर कमी करण्यासाठी
कुटूंबियांची जबाबदारी' या विषयावर मार्गदर्शन केले तसेच निपाणी टाकळी येथे डॉ
प्रभा अंतवाल यांनी 'कौटुंबिक आनंदी जीवनाची गुरूकिल्ली' या विषयी मार्गदर्शन केले
तर ढेंगळी पिंपळगावाच्या महीलांना डॉ जयश्री झेंड यांनी 'कुटूंबाच्या श्रमबचतीसाठी
कार्य सरलीकरणाची सुलभ तत्वे' विषयी माहिती देऊन शेती कामातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी
सुधारित तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमाची सांगता प्रश्नोत्तराच्या
स्पर्धाने झाली, अचुक उत्तरे देणा-या सहभागी व्यक्तीस 'उत्कृष्ट श्रोता' पुरस्कार
प्रदान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावकरी मंडळी, अंगणवाडी कार्यकर्त्या,
अखिल भारतीय संशोधन समन्वयक प्रकल्पातील सहयोगी संशोधीका ज्योत्स्ना
नेर्लेकर, रेश्मा शेख व मंजुषा रेवणवार यांनी परिश्रम घेतले.