निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर
मतदारात जागृती निर्मितीसाठी दिनांक 25 जानेवारी रोजी राष्ट्रिय मतदार दिनाचे औचित साधुन परभणी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या वतीने ‘मतदानाचा हक्क बजवा, लोकशाही वाचवा’ याविषयावर जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात
जिल्हयातील विविध शैक्षणिक संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यानी
सहभाग नोंदवीला होता. यामध्ये परभणी कृषि महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा
विद्यार्थ्यी अनिकेत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रजासत्ताक दिनानिमित्त
दि 26 जानेवारी जिल्हयाचे पालकमंत्री तथा महसुल राज्यमंत्री मा ना श्री
सुरेशरावजी धस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, याप्रसंगी जिल्हाधिकारी
मा श्री एस पी प्रताप सिंह व जिल्हा पोलिस अधिक्षक मा श्री संदिप पाटील यांची
प्रमुख उपस्थिती होती. अनिकेत पाटील यांना कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
तथा प्राचार्य डॉ बालाजी भोसले, जिमखाना उपाध्यक्ष डॉ विलास पाटील व सांस्कृतिक
समन्वयक प्रा संदीप बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.