.jpeg)
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी येथील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
शुभआशीर्वाद, प्रेरणादायी उपस्थिती व मार्गदर्शनाखाली
धुलीवंदनाचा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय आणि रंगतदार
वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
या मंगल प्रसंगी
विद्यापीठातील अधिकारी,
कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी
माननीय कुलगुरूंना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन धुलीवंदनाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा अर्पण केल्या. सर्वांनी एकमेकांना रंग लावून बंधुभाव, स्नेह, ऐक्य आणि परस्पर विश्वासाची भावना अधिक दृढ
केली. रंगांच्या उधळणीत आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचा
सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
यावेळी माननीय
कुलगुरूंनी उपस्थित सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद देताना
सांगितले की,
सण-उत्सव हे केवळ आनंद व्यक्त करण्याचे माध्यम नसून परस्पर स्नेह,
सहकार्य आणि एकात्मतेची नाळ अधिक दृढ करण्याची सुवर्णसंधी असते.
‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून शेतकरी समुदायामध्ये तसेच विद्यापीठ परिवारात सदैव
आनंद, सौहार्द, प्रगती, शैक्षणिक उत्कर्ष आणि सकारात्मक ऊर्जा नांदो, अशी
त्यांनी मंगलकामना व्यक्त केली.


