कृषि शिक्षण, संशोधन, नवोन्मेष, विस्तार व शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञानातील उल्लेखनीय योगदानाची दखल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि शिक्षण, संशोधन,
नवोन्मेष, विस्तार शिक्षण तसेच
शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञानाच्या प्रसारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘बेस्ट व्हाईस-चान्सलर अवॉर्ड-२०२५’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.
ऑल इंडिया ॲग्रीकल्चरल स्टुडंट्स असोसिएशन (एआयएएसए - AIASA) यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार ‘५व्या आंतरराष्ट्रीय ऑरगॅनिक अँड नॅचरल राईस प्रॉडक्शन सिस्टिम्स (ORP-5)’
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपत सिंघानिया सभागृह, नवी दिल्ली येथे प्रदान
करण्यात आला. या परिषदेसाठी ऑल इंडिया ॲग्रीकल्चरल स्टुडंट्स असोसिएशन, युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, रायचूर आणि इंडोनेशिया
येथील आयपीबी विद्यापीठ (IPB University, Indonesia) हे
आयोजक सहभागी आहेत.
हा सन्मान माजी केंद्रीय राज्यमंत्री, मानव
संसाधन विकास व जलसंसाधने मंत्रालय; नदी विकास व गंगा
पुनरुज्जीवन तथा प्रमुख पाहुणे माननीय डॉ. सत्यपाल सिंह, इम्फाळ येथील केंद्रीय
कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मभूषण प्रा. (डॉ.) आर. बी. सिंह, आयोजन समिती अध्यक्ष प्रा. (डॉ.) सहदेव सिंह, एआयएएसएचे
राष्ट्रीय अध्यक्ष श्री. निनाद महाजन, रायचूर कृषी विज्ञान
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. गुरुराज सुंकड, निमॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पंकज, ORP-5 चे आंतरराष्ट्रीय संयोजक प्रा. (डॉ.) स्टेफानो बोच्ची, जपान येथील तोहोकू विद्यापीठाचे प्राध्यापक प्रा. (डॉ.) मिजुहिको निशिदा,
AIASA चे आधारस्थंभ डॉ. आर. पी. सिंह, संरक्षक,
ORP-5 चे आयोजन सचिव प्रा. वाय. व्ही. सिंह आदी
मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराच्या प्रशस्तीपत्रात प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच
कृषि शिक्षण, संशोधन, नवोन्मेष
आणि विस्तार क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या
नेतृत्वाखाली ड्रोन तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण, शेतकरी-केंद्रित
तंत्रज्ञान आणि देशभर तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळाल्याचे नमूद करण्यात आले
आहे. तसेच संस्थात्मक विकास, संशोधन भागीदारी, पायाभूत सुविधांचा विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि
कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (CSR) माध्यमातून मिळविलेला भरीव
निधी यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या २,००० एकरांपेक्षा अधिक पडीक जमिनीचे उत्पादक कृषि क्षेत्रात रूपांतर करण्याच्या
कार्याचीही प्रशस्तीपत्रात विशेष नोंद घेण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत सेंद्रिय तांदूळ उत्पादन प्रणालीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर
आधारित यांत्रिकीकरण आणि डिजिटल बुद्धिमत्ता
(AI-Driven Mechanisation and Digital Intelligence
for Organic Rice Production Systems)’ या थीम
VII वरील तांत्रिक सत्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविली. या सत्रात सेंद्रिय तांदूळ उत्पादन प्रणालीमध्ये कृत्रिम
बुद्धिमत्ता, कृषि यांत्रिकीकरण, डिजिटल
तंत्रज्ञान, अचूक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासंदर्भात
विविध विषयांवर तज्ज्ञांनी चर्चा केली.
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठामध्ये कृषि शिक्षण, संशोधन,
विस्तार शिक्षण, डिजिटल कृषि, हवामान-स्मार्ट कृषि, कृषि यांत्रिकीकरण आणि शेतकरी-केंद्रित
तंत्रज्ञान यांना विशेष चालना देण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय
स्तरावर दखल घेत ‘बेस्ट व्हाईस-चान्सलर अवॉर्ड-२०२५’ हा
सन्मान प्राप्त झाल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लौकिकात आणखी
भर पडली आहे.
या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे अधिकारी, संचालक, अधिष्ठाता, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच कृषि क्षेत्रातील विविध घटकांकडून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)





.jpeg)

