वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक २७
फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कृषि अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ किशोर देशमुख हे होते तर प्रमुख व्यक्ते
म्हणुन कै कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ
अरूण पडघण, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ जयश्री एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख व्यक्ते
डॉ अरूण पडघण आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मराठी भाषेचं संवर्धन करायचं असेत
तर प्रत्येकांनी दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करायला हवा. मराठी भाषेचे लहान
मुलांवर आईला संस्कार करावे लागतील. भाषा शिक्षणासाठी शाळा गरजेची असुन पालकांनी
आवर्जुन मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश दिला पाहिजे. शाळेतच मुलांना मराठी साहित्याची
ओळख करून दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मराठी संवाद’ या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात श्रुतीका भोयर,
अजित खारगे, गोपाल बोरसे, कौसडीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ राजेश कदम यांनी केले. सुत्रसंचालन अमर गाडवे यांनी केले तर आभार
डॉ प्रविण कापसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ सुनिलदत्त जक्कावाड, प्रा
राजेंद्र सावंत, डॉ अनुराधा लाड, रोहीणी कोकाटे, भक्ती भोसले, निखिल ढवले आदींचे
सहकार्य लाभले. कार्यक्रमास विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यी मोठया संख्येने
उपस्थित होते.