परभणी येथे संजिवनी एज्युकेशन सोसायटी,
आनंद शिक्षण
प्रसारक मंडळ, संजिवनी मित्र मंडळ यांच्या
संयुक्त विद्यमाने ७
ते ११ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन
आयोजीत करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी
फडणवीस यांच्या
हस्ते झाले तर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ अशोक ढवण, मा आमदार श्री बबणराव लोणीकर, मा आमदार
सौ मेघणा
बोर्डीकर, संयोजक श्री आनंद भरोसे माजी आ. श्री विजयराव गव्हाणे, मा श्री मोहनराव
फड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कृषि प्रदर्शनीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील अखिल
भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, कृषि यंत्र व शक्ती विभाग कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तर्फे सुधारीत व अद्ययावत शेती अवजारांचे भव्य प्रदर्शन व सादरीकरण करण्यात
आले. यामध्ये विद्यापीठ
विकसीत मनुष्यचलित बैलचलित व टॅक्टरचलित
औजाराचे सादरिकरण
करण्यात आले होते.
कोरडवाहू शेतक-यांना उत्पादनावरील खर्च कमी करून
यांत्रिकीकरणाव्दारे शेतक-यांचे
आर्थिकस्तर उंचवन्याच्या दृष्टीने औजारे विकसीत करण्यात आली असुन त्यात मुख्यत्वे एकाच वेळी पाच काम
करणारे पाच ओळीचे टॅक्टरचलीत रूंद सरी वरंबा
फवारणी व रासणी यंत्र, बैलचलीत १२ नोझालचे सौर फवारणी यंत्राचे
प्रात्यक्षिक प्रकल्प प्रमुख डॉ
स्मिता नटवरलाल सोलंकी यांनी दिले.
या
प्रसंगी मा
श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या कामाची प्रशंसा करीत शेतीतील यांत्रिकीकरणावर भर देऊन
जास्तीत जास्त शेतकामाकरिता
यंत्र व अवजाराचा वापर वाढला पाहिजे, ही शेती अवजारे निर्मात्यासोबत सामंजस्य करार
करून विकसीत अवजारे शेतक-यांपर्यंत
पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
सदरील
कृषि प्रदर्शनीतील दालन मांडणीसाठी कुलगुरू
मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके यांचे मार्गदर्शन
लाभले. प्रा. डी. डी. टेकाळे, प्रा. डी. व्ही. पाटील,
श्री. अजय
वाघमारे, श्री. डी. बी. यंदे, श्री. संजय सदावर्ते,
श्री. रणबावळे, श्री. भरत खटींग,
श्री. रूपेश
काकडे, श्री. आव्हाड, श्री. जीजा शिंदे आदींनी सहभाग घेवुन कार्य केले.