एकात्मतेचे प्रतिक असलेला परभणी येथील प्रसिध्द हजरत
सयद शाह तुराबुल हक यांच्या ऊरूसानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील कर्मचा-यांच्या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्यात आला. संदलचा
प्रारंभ शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व कुलसचिव श्री रणजित पाटील
यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शेख
सलीम, रामसिंग पवार, श्री आडे, शेख मैहमुद, मोईनभाई, युसुफ अली, जाफर अली, कौशाबाई मगर आदीसह विद्यापीठातील कर्मचारी मोठया संख्येने
उपस्थित होते.


