Thursday, February 27, 2020

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच संपन्‍न झाला. या कार्यक्रमासाठी सामुहिक नृत्य्‍, लोकगीते, लावणी, मॅशअप गीतांवर आधारित नृत्य्‍, रॅप साँग्ज् आदी विविध कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपले कलागुणांचे सादरिकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्या डॉ. जयश्री झेंड या होत्‍या, यावेळी मार्गदर्शनात त्‍या म्‍हणाल्‍या की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यस्‍त जीवनात विविध कला प्रकारांचे महत्व जाणून स्‍वत:च्या आवडीप्रमाणे कला अवगत करणे आवश्‍यक आहे, व्यक्तीला स्वास्थपूर्ण जीवनासाठी कला ही एक थेरपी म्हणजेच उपचारात्मक पध्दती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी मारीया मंजूर यशदिप उराडे यांनी केले तर आभार प्राची गट्टानी हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जया बंगाळे, डॉ. माधुरी कुलकर्णी, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.