वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व राष्ट्रिय
कृषि विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 फेब्रुवारी रोजी “रेशीम कोष
निर्मीती व काढणी तंत्रज्ञान” या विषयावर एक प्रशिक्षण
कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक
डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, किटकशास्त्र
विभाग प्रमुख डॉ.संजिव बंटेवाड, पाणी व्यवस्थापण योजनाचे प्रभारी
अधिकारी डॉ. अशोक कडाळे, पुर्णा येथील रेशीम कोष मार्केटचे
अध्यक्ष डॉ. संजय लोलगे, संशोधन विस्तार केंद्र, केंद्रिय
रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. ए. जे. कारंडे, डॉ. के. के. डाखोरे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेशसिंह
चौहान आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाषणात
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर म्हणाले की, रेशीम शेतीमुळे खेडयात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या
असून रेशीम उद्योगाकडे अनेक शेतकरी वळत आहे. कृषि
विद्यापीठाच्या रेशीम संशोधन केंद्राच्या वतीने रेशीम उत्पादकांना
सातत्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून
तांत्रीक मार्गदर्शन करण्यात येत आहे, याचा निश्चितच लाभ होत आहे.
तांत्रिक
सत्रात डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम कोष निर्मीती व काढणी
तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास
नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्हयातुन
मोठया संखेने शेतकरी उपस्थीत होते. सुत्रसंचालन प्रा. चंद्रकांत अडसुळ यांनी
केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरूण काकडे, हरिश्चंद्र
ढगे, इंगोले आदीसह विद्यार्थ्यींनी
परिश्रम
घेतले.