Wednesday, March 17, 2021

नैसर्गिक साधसामुग्रीचा योग्य वापर करुन पर्यावरण सुरक्षित ठेवा .... डॉ. एम. एस. कैरॉन

सेंद्रीय शेती वरील ऑनलाईन प्रशिक्षणात मार्गदर्शन

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या दुस-या दिवसी दिनांक 16 मार्च रोजी नागपूर येथील मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. एम. एस. कैरॉन यांनी सेंद्रीय शेती रचना आणि पीक नियोजन, पीक फेरपालट आणि इतर कृषी पध्दतीया विषयावर तर रायपूर (गोंदीया) येथील रुची बायो टेक आणि फार्म्सचे डॉ. महेंद्र ठाकूर यांनी रुची बायो अॅग्रो, गोंदीयाची सेंद्रीय शेती व्यवस्थापनातील यशोगाथाया विषयावर व्याख्याने झाली. यावेळी आयोजक डॉ. वाचस्पती पांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश भालेराव यांची उपस्थित होते.

तांत्रिक सत्रात डॉ. एम. एस. कैरॉन यांनी असे सांगितले की, नैसर्गिक साधनसामुग्रीचा योग्य वापर करुन पर्यावरण संतुलीत ठेवणे गरजेचे आहे. तसेच शाश्वत सेंद्रीय शेती ही मातीचे आरोग्य आणि सेंद्रीय कर्ब समतोल ठेवण्यासाठी महत्वाची भुमिका बजावते. तर मार्गदर्शनात डॉ. महेंद्र ठाकूर यांनी म्‍हणाले की, शेतक­यांना उत्पादनात वाढ करण्यासाठी त्यांच्या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असणे आवश्यक आहे. ज्या जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असते त्या जमिनीच्या उत्पादन हे समतोल राहते व उत्पादीत मालाची गुणवत्ता, रंग, सुवास, ठिकाऊपणा वाढतो.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. राजेश भालेराव, यांनी तर आभार डॉ. विद्यानंद मानवार यांनी मानले. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस. बी. बोरगांवकर, कु. चंद्रकला, कु. व्हिन्यासा, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. श्रीधर पतंगे, श्री. सतिश कटारे व श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.