Tuesday, March 9, 2021

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावात कुटुंबाचे आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांचे मोठे योगदान........ कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृविच्‍या वतीने ऑनलाईन जागतिक महिला दिन महोत्सव साजरा, इतर देशातील संशोधिकांनीही घेतला सहभाग

महिलाच हीच कुटुंबाचा पाया असुन सध्याच्या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावात कुटुंबाच्या आरोग्‍य व सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या मोठे योगदान आहेविद्यापीठ विकसित महिला शेतकरी उपयोगी तंत्रज्ञान तळागाळात पोहच‍विण्‍याचे मोठे कार्य विद्यापीठात कार्यरत असलेल्‍या विविध संशोधन केंद्रेविद्याशाखेतील व कृषी विज्ञान केंद्रातील महिला शास्त्रज्ञां करीत आहेतअसे प्रतिपादन कुलगुरु माडॉअशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या वतीने ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधुन ऑनलाईन महोत्सवाचे आयोजन करण्यात होते, कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, महिला आर्थिक व विकास महामंडळाचे औरंगाबाद विभागीय सनियंत्रण अधिकारी श्री सिद्धाराम माशाळे हे उपस्थित होते तर श्रीमती उषाताई अशोक ढवण, श्रीमती उज्वला धर्मराज गोखले, श्रीमती सुवर्णा दत्तप्रसाद वासकर, श्रीमती चारुशीला देवराव देवसरकर, श्रीमती दीपिका रणजीत पाटील, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय संशोधिका युक्रेन येथील नॅशनल इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी प्राध्यापिका डॉ. नतालिया ऑर्लेंको, अल्जेरिया येथील फरहीत अब्बास युनिव्हर्सिटीच्‍या डॉ. रायमा लाबार्ड, कॅनडा येथील क्लिअरपाथ, रोबोटिक्सच्‍या डॉ. एरिका इवांस आदींनी विशेष सहभाग घेतला.

संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा देऊन आजची स्त्री अबला न राहता सबला होऊन एक शक्तीच्या रूपात पुढे येत असल्‍याचे म्‍हणाले. आंतरराष्‍ट्रीय संशोधिका डॉ. नतालिया ऑर्लेंको, डॉ. रायमा लाबार्ड, डॉ. एरिका इवांस यांनी भारतीय महिलांचे विविध क्षेत्रात मोठे योगदान असल्‍याचे म्‍हणाल्‍या.

मार्गदर्शनात श्रीमती उषा अशोक ढवण यांनी प्रत्येक आईने आपल्या पाल्यावर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता समान संस्कार करण्‍याचे आवाहन केले तर श्रीमती दीपिका रणजित पाटील यांनी महिलांच्या मुलगी, बहीण,पत्नी, आई अशा प्रत्येक भूमिकेचे महत्त्व विशद केले.

विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दीपा राणी देवतराज यांनी महिलांमध्ये आव्हाने स्वीकारण्याची व ती उत्कृष्टपणे पेलण्याची क्षमता अधिक प्रमाणात दिसून येते आणि त्याचा उपयोग त्यांनी स्वतः साठी करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन करून त्‍यांनी मुलींना तथा महिलांना सद्यपरिस्थितीत करिअर मधील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी महिलांचे हक्क आणि अधिकार व त्यांच्या पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतांना कुटुंबात प्रत्येक स्त्रीला ती आई असो अथवा पत्नी असो, तिला सन्मानाने वागवण्यात यावे अश्‍या म्‍हणाल्‍या.

प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी डिजिटल तथा यांत्रिकीकरण माध्यमातून प्रगत शेती तथा महिलांसाठी नाहेप प्रकल्पाचे योगदान याविषयी माहिती दिली. मविम परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती नीता अंभोरे यांनी ग्रामीण, तळागाळातील, निरक्षर-सुशिक्षीत, सर्व स्तरातील महिलांना उद्योजकीय विचारातून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी वरिष्ठ शास्त्रज्ञा प्रा. नीता गायकवाड, डॉ अविनाश काकडे, श्री तांझिम खान आदींनी विशेष परिश्रम घेतले. सदर ऑनलाईन कार्यक्रमास महिला उद्योजिका, प्राध्यापक, पालकवर्ग, सामुदायिक विज्ञान पदवीपूर्व व पदव्यूत्तर विद्यार्थी,बहुसंख्येने सहभागी झाले.