वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय ग्रामिण कृषि कार्यानुभव जागरुकता कार्यक्रम (रावे) आणि औद्योगीक संलग्नता उपक्रमातंर्गत मौजे रायपुर येथे लम्पी रोग बाबत जागरुकता निर्माण करुन पशुधन विकास अधिकारी डॉ. एल. टी. कनले व डॉ. माने यांचे मार्गदर्शनाखाली गावातील पशुचे लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. राजेद्र सावंत, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संतोष बरकुले, डॉ. दत्तात्रय दळवी आदीची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेकरिता रायपुर व परळगव्हाण येथील रावेच्या कृषि कन्यांनी परिश्रम घेतले.