वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
रेशीम संशोधन योजना व परभणी कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त
विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव जागृकता कार्यक्रम (रावे) आणि औद्योगीक संलग्नता
उपक्रमांतर्गत मानवत तालुक्यातील
मौजे मंगरूळ येथे दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. जमीर खॉ पठाण हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख (विस्तार शिक्षण) डॉ. राजेश कदम, कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे, किटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी
डॉ चंद्रकांत लटपटे, मंडळ
कृषि अधिकारी डॉ आर बी नाईक, पशुसंवर्धन
व दुग्धशास्त्र तज्ञ डॉ रमेश पाटील, डॉ.जयकुमार
देशमुख आदींची उपस्थिती होती.
डॉ राजेश कदम यांनी कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा बददल माहिती देऊन कृषि विद्यापीठात उपलब्ध निविष्ठांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.डॉ. गजानन गडदे यांनी कापुस, तुर, हरबरा या पिकाच्या सुधारीत संकरवाण व खत, पानी यवस्थापन बददल व उत्पादन वाढीसाठी आवश्यक सुत्राबददल माहिती दिली. डॉ. अनंत लाड यांनी रब्बी पिक संरक्षण बददल तर डॉ. चंद्रशेखर अंबाडकर जैविक बुरशी नाशके, ट्रायकोडर्मा, जैविक खत रायझोफॉस, रायझोबीयम यांची बीजप्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम किटकावर प्रादुर्भाव करणारी उझीमाशी नियंत्रण करण्यासाठी लागणारे जैविक किटक (एन टी पाऊच) वापरण्याची शिफारस केली.
कार्यक्रमास शेतकरी बांधव व कृषिकन्या, अशोक देशमाने, राजाभाऊ डुकरे, मोहन कापसे, अशोक नाइकनवरे हे शेतकरी उपस्थीत होते.सरपंच श्री. जमीर खॉ पठाण यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक डॉ. रमेश पाटील. सुत्रसंचालन पल्लवी लाड व विद्या खिल्लारे यांनी केले तर आभार डॉ. जयकुमार देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यसस्वितेसाठी मंगरूळ व कोल्हावाडी येथील कृषि कन्या यांनी पुढाकार घेतला.


