अर्धापूर जि. नांदेड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविदयालयाच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमांतर्गत अर्धापूर जि. नांदेड येथे केळी पिक परिसंवाद व कृषीपीक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मोहन पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराअध्यक्ष श्री. पुंडलिक उर्फ छत्रपती कानोडे, मुख्य अधिकारी श्री. शैलेश फडसे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मोहन पाटील यांनी फळ पिकांचे महत्व व व्यवस्थापन विषयावर तर केळी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. सुजाता धृतराज यांनी केळी पिक लागवड व व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. गजेंद्र जगताप व डॉ. बी. व्ही. भेदे यांनी नांदेड जिल्यातील प्रमुख पिकांवरील रोग व किटक व्यवस्थापन मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी केले. सूत्रसंचालन उद्यानदूत धनंजय देशमुख यांनी केले तर आभार डॉ. सुबोध खंडागळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्यानदूत व समस्त गावकरी मंडळी अर्धापूर यांनी सहकार्य केले.