Monday, October 2, 2023

वनामकृवित १३ वे डॉ.जी.एस.शेखाँन स्मृती व्याख्यान संपन्न

भारतीय मृद विज्ञान संस्था, नवी दिल्ली शाखा परभणी चा कृषि शाखेचा उपक्रम

भारतीय विज्ञान शाखा नवी दिल्ली शाखा परभणी व वसंतराव नाईक  मराठवाडा क‍ृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग संयुक्त विद्यमाने दिनांक ३० सप्‍टेंबर रोजी १३ वे  डॉ  जी एस शेखॉन स्‍मृती व्‍याख्‍यानाचे आयोजन  करण्‍यात आले होते. उष्ण कटीबंधीय फळबागांच्या समस्या व नियोजन या विषयावर सोलापुर येथील डाळींब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राजीव मराठे यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. अनिल धमक आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. मराठे यांनी फळबागांच्या समस्येवर शेतक­यांच्या करीता काय काय उपाय करता येतील यावर सादरीकरण केले. यामध्ये संशोधकांनी शेतक­यांच्या समस्यावर संशोधन करुन समाधान शोधण्यासाठी भावी संशोधकांनी कार्य करावे, असे म्हटले. तर अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांनी नवसंशोधनाची दिशा हि बहुशाखीय असावी असे मत व्‍यक्‍त करून डॉ. जी. एस. शेखाँन यांनी मृदा संशोधनात मोलाचे कार्य केल्‍याचे म्‍हणाले.

कार्यक्रमात कै डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भावपुर्णं श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पपीता गोरखेडे यांनी केले, तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रमास मोठा प्रमाणात पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक वृंध, संशोधक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ.संतोष चिक्षे, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. स्वाती झाडे, डॉ. महेश वाघमारे, डॉ. प्रविण राठोड, डॉ. संतोष पिल्लेवाड डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री. भानुदास इंगोले, श्री. आनंद नंदनवरे, श्री. शिरीष गोरे व आचार्य पदवी विद्यार्थी शुभम गिरडेकर, प्रिया सत्वधर, शुभांगी आवटे, धिरज कदम, निशीगंधा चव्हाण यांनी सहकार्य केले.