वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प - ज्वार संशोधन केंद्र, परभणी मार्फत आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठ विकसित रबी ज्वारीचे वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती आणि सीएसव्ही-२९ आर बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बीज प्रक्रियेसाठी गाऊचु, ट्रयकोबुस्ट आणि घडीपुस्तीका वाटप करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन गावातील प्रतिष्ठीत शेतकरी श्री बालासाहेबजी रेंगे, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन.जावळे, ज्वार रोगशास्ञज्ञ डॉ.के.डी.नवगीरे, अभासकृषिरत महिला प्रकल्पाच्या केंद्र समन्वयक डॉ. सुनिता काळे, सहाय्यक ज्वार कृषिविद्यावेत्ता श्रीमती प्रितम भुतडा आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितीत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करतांना डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ याविषयी माहिती देऊन ज्वारीची योग्य पध्दतीने लागवड आणि प्रक्रिया उद्योग, प्रायमरि प्रोसेसिंग, ग्रेडीग, पॅकेजींग ईत्यादी बाबींचा शेतक-यांनी उपयोग करुन जास्तीत जास्त आर्थिक नफा कसा घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ.एल. एन. जावळे यांनी सुधारित वाणांचे वैशिष्टये यावर मार्गदर्शन करून शेतक-यांना आद्यरेषिय पिक प्रात्यक्षिक चांगल्या पध्दतीने घेण्याचे आव्हान केले. डॉ. सुनिता काळे हयांनी यांनी भरडधान्याचे आहारामधील महत्व आणि विविध पदार्थ हया विषयी मार्गदर्शन केले. डॉ. के.डी. नवगीरे यांनी ज्वारीवर येणारे विविध रोग, बीजप्रक्रिया आणि जैविक निविष्ठांचा वापर याबाबत माहिती दिली. तर श्रीमती प्रितम भुतडा यांनी ज्वारीची सुधारित लागवड तंञज्ञान लागवड पध्दत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले. कार्यक्रमास जांब गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसाद देशमुख, श्री बालासाहेब रेंगे, आणि ज्वार संशोधन केंद्राचे इतर कर्मचारी हयांनी प्रयत्न केले.