Sunday, March 17, 2024

वनामकृविस सांस्कृतिक युवक महोत्सव इंद्रधनुष्य स्पर्धेत घवघवीत यश

 सांस्कृतिक स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते चालना.... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे दिनांक ११ ते १५ मार्च दरम्यान एकोणिसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३-२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वनामकृविस पोस्टर मेकिंग आणि इन्स्टॉलेशन या कला प्रकारात रोप्य पदक तर स्कीट या नाटक प्रकारात कास्यपदक मिळाले. यानिमित्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि समन्वयकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक स्पर्धेतून चालना मिळते आणि भविष्यात एक उत्कृष्ट कलाकार निर्माण होतो असे नमूद केले. या स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले होते. वनामकृविच्या एकूण  ४१ विद्यार्थ्यांनी लोकनाट्य, माईम, स्किट (नाटक) आणि फाईन आर्ट (पोस्टर मेकिंग, इन्स्टॉलेशन) या प्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, कुलसचिव श्री पुरभा काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि संघ समन्वयक, व्यवस्थापकांचे अभिनंदन केले. समन्वयक म्हणून डॉ. आशा देशमुख होत्या तर डॉ. विजय सावंत यांनी व्यवस्थापक म्हणून कार्य केले तसेच सचिन पवने आणि करण सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.