परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील करडई व तूर पिकाच्या पैदासकार बियाणे उत्पादन प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI) चे माजी संचालक व पद्मश्री पुरस्कारप्राप्त माननीय डॉ. ए. के. सिंह यांनी दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी भेट दिली.
या
भेटीदरम्यान पद्मश्री डॉ. ए. के. सिंह यांनी विविध पिकांच्या पैदासकार बियाणे
उत्पादन प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची वाढ,
उत्पादन क्षमता, बियाण्याची शुद्धता तसेच
वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती घेतली. विद्यापीठामध्ये
सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या कार्याचे तसेच विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या बियाणे उत्पादन
कार्यक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. पैदासकार (ब्रीडर) बियाणे उत्पादनातील
गुणवत्ता नियंत्रण, भविष्यातील संशोधनाच्या दिशा तसेच
शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार बियाणे पोहोचविण्याच्या दृष्टीने त्यांनी मोलाचे
मार्गदर्शन केले.
यावेळी
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत
काळपांडे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ.
विलास खर्गखराटे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ.
राजेश धूतमल, तसेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके
आदी उपस्थित होते.
या भेटीमुळे विद्यापीठाच्या संशोधन व बियाणे उत्पादन कार्यास नवी दिशा मिळणार असून शेतकरीहिताच्या दृष्टीने ही भेट अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

.jpeg)
