Tuesday, September 3, 2013

लातुर येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय नामविस्तारीकरण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या लातुर येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय नामविस्‍तारीकरणाचा कार्यक्रम तसेच नवीन बांधण्‍यात आलेल्‍या सभागृहाचे उद्घाटन दि. 03 सप्‍टेंबर 2013 रोजी लातुर येथे संपन्‍न झाला. या कार्यक्रमास उद्घाटक म्‍हणुन कृषि व पणन मंत्री मा ना श्री राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील तर अध्यक्ष म्‍हणुन गृह राज्‍यमंत्री तथा लातुरचे पालकमंत्री मा ना श्री सतेजजी पाटील होते.
उद्घाटनपर भाषणात कृषि व पणन मंत्री मा ना श्री राधाकृ‍ष्‍णजी विखे पाटील म्‍हणाले की, स्‍वर्गीय मा. विलासरावजी देशमुख यांच्‍या प्रयत्‍नामुळे लातुर येथे महाराष्‍ट्रातील पहिले शासकीय कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय स्‍थापन करण्‍यात आले. या महाविद्यालयात त्‍यांच्‍या कार्यावर आधारीत संग्रहालय स्‍थापन करण्‍यात यावे. तसेच विद्यापीठाने कृत्रिम पावसावर संशोधन करण्‍याची गरज आहे. चारही कृषि विद्यापीठातील रिक्‍त पदे लवकरच स्‍वतंत्र बोर्डाची स्‍थापना करुन भरण्‍यात येणार असल्‍याची घोषणा त्‍यांनी केली.
लातुर विभागासाठी स्‍वतंत्र कृषि विद्यापीठ स्‍थापन करण्‍याची आवश्‍यकता अध्‍यक्षीय भाषणात गृह राज्‍यमंत्री तथा लातुरचे पालकमंत्री मा ना श्री सतेजजी पाटील यांनी व्‍यक्‍त केली. या प्रस्‍तावास राज्‍याच्‍या साक्षरता परिषदेचे अध्‍यक्ष मा अॅड श्री त्र्यंबकदासजी झंवर यांनी आपल्‍या मनोगतात अनुमोदन दिले.
विधानपरिषद सदस्‍य मा आ श्री दिलीपरावजी देशमुख व मा आ श्री अमितजी देशमुख यांनी आपल्‍या मनोगतात विद्यापीठाने स्‍वर्गीय विलासरावजी देशमुख यांचे नाव कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास दिल्‍या बददल आभार व्‍यक्‍त केले.   
प्रास्‍ताविकात विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे म्‍हणाले की, विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील विद्यार्थ्‍यांना देशपातळीवर नाव लौकिक कमवला असुन स्‍वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्‍या नावे असलेल्‍या या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयाचे नाव आंतरराष्‍ट्रीय पातळी न्‍यावे. याप्रसंगी त्‍यांनी स्‍वर्गीय विलासरावजी देशमुख यांना अभिवादन केले.  
महाविद्यालयाच्‍या नवीनच बांधण्‍यात आलेले 600 आसन क्षमता असलेले वातानुकूलीत सभागृहाचे उद्घाटन मान्‍यवरांचे हस्‍ते करण्‍यात आले.
या कार्यक्रमास विधान परीषद सदस्‍य मा आ श्री दिलीपरावजी देशमुख, मा आ श्री अमितजी देशमुख, पुणे ये‍थील कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा श्री विजयरावजी कोलते, विधानपरिषदेचे सद्स्‍य मा आ श्री विक्रमजी काळे, लातुर ग्रामीण चे आमदार मा आ श्री वैजनाथरावजी शिंदे, राज्‍याच्‍या साक्षरता परिषदेचे अध्‍यक्ष मा अॅड श्री त्र्यंबकदासजी झंवर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा श्री दत्‍तात्रे बनसोडे, विभागीय कृषि संचालक श्री कृष्‍णकांत देशमुख, फलोत्‍पादन संचालक श्री अनंतराव जावळे, पणन महासंघाचे सचिव श्री दिपक तावरे, शिक्षण संचालक डॉ शिवाजी कदम, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री काशिनाथ पागिरे, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्‍वामी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे यांनी केले. यावेळी लातुर येथील प्रतिष्ठित नागरीक, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.