वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या
अंतिम वर्षातील कृषिदुतांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत मौजे दामपुरी
येथे घटसर्प व फ-या या दोन रोगांसाठी जनावरांना प्रतिबंधनात्मक लसीकरणाचा
कार्यक्रम घेण्यात आला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश माने यांनी जनावरांचे
लसीकरण केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच श्री माणिकराव गमे व
शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिदुत
विनायक राठोड, साईनाथ तांबोळी, आमोल मोरे, शेख आशिफ, बालाजी डाके, श्रीकांत गोरे,
नागेश एंगडे, विकास कदम, महेश देशमुख, शेख मोईज आदिंनी परिश्रम घेतले.
ग्रामीण कृषि
कार्यानुभव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन.
डी. पवार यांच्या सुचनेनुसर आणि विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा सहसमन्वयक
डॉ. बी; एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. राजेश
कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. नागरगोजे व कार्यक्रम प्रमुख डॉ. के. एस. बेग
यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.