Saturday, September 7, 2013

मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन

मराठवाडा मुक्‍ती दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेंबर 2013 रोजी सकाळी 11.00 वाजता कृषि महाविद्यालय, परभणीच्‍या सभागृहामध्‍ये रबी पीक शेतकरी मेळावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृ‍षि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत करण्‍यात आला असुन विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ के पी गोरे अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. मेळाव्‍यात चर्चासत्राचे व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ रबी पीक लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहे.

      सर्व शेतकरी बांधवांनी सदरील मेळाव्‍यास मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश आहिरे यांनी केले आहे.