Friday, September 6, 2013

जांब येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने कृषिदुतांनी मौजे जांब येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब रेंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रगतशील शेतकरी साहेबराव काकडे, विस्‍तार विभागाचे  विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे यांची उपस्थिती होती. तसेच अ.भा.स.करडई संशोधन प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. बी. घुगे, पारवा येथील सरपंच रामराव काळे, कृषि सहाय्यक श्री ए. एस. जाधव, बाळासाहेब रेंगे, सय्यद इसाक सय्यद चॉंद्, राजेभाऊ रेंगे, रामराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे सहसमन्‍वयक तथा विस्‍तार विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे यांनी केले. याप्रसंगी एकात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ. व्‍ही. एम. घोळवे, एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनावर डॉ. डि. आर. कदम, तण व्‍यवस्‍थापनावर डॉ. ए.एस.जाधव, संत्रा लागवड तंत्रज्ञानावर डॉ. डि. एम. नाईक तर कापुस लागवड तंत्रज्ञानावर श्री प्रा. एस. एस. सोळंके यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या मेळाव्‍यास परीसरातील शेतकरी मेळाव्‍यास मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषिदुत श्री मस्‍के व भोगल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एस. व्‍ही. पवार यांनी केले.

            मेळावा यशस्वीतेसाठी कृषिदुत काटे, मुंगीलवार, लांडे, बरकडे, खटींग, कोलते, काळे, गुंजाळ, दांगडे, धाटबळे, देटवे, अवकाळे, भंडारे, लक्ष्मण कुमार, भोकरे, निशांत कुमार आदीनी परिश्रम घेतले. सदरील मेळाव्याच्या यशस्तीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यकमाचे प्रभारी डॉ. आर. पी. कदम कार्यक्रम अधिकारी प्रा. डि. व्ही. बैनवाड यांचे मार्गदर्शन लाभले