विद्यापीठातंर्गत असलेल्या लातुर येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय नामविस्तारीकरण व सभागृहाचे उद् घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या लातुर येथील
कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान
महाविद्यालय नामविस्तारीकरणाचा कार्यक्रम तसेच नवीन बांधण्यात आलेल्या सभागृहाचे
उद्घाटन दि. 03 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 9.00 वा लातुर येथील कृषि
महाविद्यालयाच्या परिसरात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उद्घाटक
म्हणुन राज्याचे कृषि व पणन मंत्री मा ना श्री राधाकृष्णजी विखे पाटील राहणार
असुन राज्याचे गृह राज्यमंत्री तथा लातुरचे पालकमंत्री मा ना श्री सतेजजी पाटील
अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तसेच विधान परीषद सदस्य मा आ श्री दिलीपरावजी
देशमुख, मा आ श्री अमितजी देशमुख, पुणे येथील कृषि परिषदेचे उपाध्यक्ष मा श्री
विजयरावजी कोलते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यसभा सद्स्य मा खा श्री
जनार्दनजी वाघमारे, माजी मुख्यमंत्री तथा निलंगा चे आमदार मा आ डॉ शिवाजीरावजी
पाटील निलंगेकर, लातुरचे खासदार मा खा श्री जयवंतरावजी आवळे, विधान परिषदेचे सद्स्य
मा आ श्री सतीशजी चव्हाण, औसाचे आमदार मा आ श्री बस्वराजजी पाटील, विधान परिषदेचे सद्स्य मा आ श्री विक्रमजी
काळे, अहमदपुर चे आमदार मा आ श्री बाबासाहेबजी पाटील, उदगीरचे चे आमदार मा आ श्री
सुधाकररावजी भालेराव, लातुर ग्रामीण चे आमदार मा आ श्री वैजनाथरावजी शिंदे, राज्याच्या
साक्षरता परिषदेचे अध्यक्ष मा अॅड श्री त्र्यंबकदासजी झंवर आणि वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनरावजी गोरे हे उपस्थित राहणार आहेत.