Tuesday, September 10, 2013

गणरायाचे आगमन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने गणेश मुर्तीची स्‍थापना दि 9 सप्‍टेंबर रोजी करण्‍यात आली. विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते श्रींच्‍या मुर्तीचे पुजन करण्‍यात आले. या प्रसंगी कृषि महावि़द्यालयाचे सहयोगी अधि‍ष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार, जिमखाना उपाध्‍यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विभाग प्रमुख डॉ जी एम वाघमारे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ खंदारे, प्रा राठोड व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.