Thursday, September 12, 2013

संघर्षाशिवाय प्रगती नाही ................ डॉ उमाकांतजी राठोड


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयात गणेशोत्‍सव 2013 निमित्‍य आज दि 11.09.13 रोजी सुप्रसिध्‍द वक्‍ते डॉ उमाकांतजी राठोड यांचे ‘भगतसिंग – युवकांचे प्रेरणास्‍थान’ या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी प्राचार्य डॉ विलास पाटील होते तर विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, डॉ बी व्‍ही आसेवार व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ उमाकांतजी राठोड आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, भगतसिंग यांचे चरित्र आजच्‍या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्‍या युवकांनी देश व समाज घडविण्‍यासाठी  त्‍याग व बलीदाना करणे आवश्‍यक आहे. संघर्षाशिवाय कोणाचीही प्रगती होत नाही, विद्यार्थ्‍यानी यशासाठी संघर्ष करावा. गणेशोत्‍सवानिमित्‍त विद्यार्थ्‍यानी केलेल्‍या विविध प्रबोधनात्‍मक व्‍याख्‍याने आयोजित करून चांगला उपक्रम सुरू केला आहे असे मत अध्‍यक्षयीय समारोपात डॉ विलास पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदीप टाले यांनी केले तर आभार अमोल बांगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.