Wednesday, September 18, 2013

गृहविज्ञान तंत्रज्ञानावरील पुस्‍तकांचे विमोचन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयास भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक मा. डॉ अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते प्राचार्या प्रा विशाला पटनम व डॉ वीणा भालेराव लिखीत ‘बालकांच्‍या बौध्दिक व संवाद कौशल्‍यासाठी विकसीत केलेल्‍या बहुभाषिक बालगीते व भाषणे’ या प्रभावी ई-बुकचे विमोचन करण्‍यात आले. तसेच अखिल भारतीय सन्‍वयक संशोधन प्रकल्‍पांतर्गत विकसीत विविध संशोधनात्‍मक तंत्रज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्‍याच्‍या उद्देशाने तयार केलेल्‍या ‘गृहविज्ञान तंत्रज्ञानाचा स्‍वीकार कुटुंबाचा आधार’ या पुस्तिकेचे विमोचन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ गोविंदराव भराड यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी मान्‍यवरांनी बालमार्गदर्शन चिकीत्‍सालय, वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना प्रयोगशाळेस भेट दिली. एलपीपी स्‍कुलच्‍या ब्रिज सेक्‍शनच्‍या विद्यार्थ्‍यांनी पर्यावरण संवर्धनावर उत्‍कृष्‍ट शास्‍त्रोक्‍त भाषण मान्‍यवरांच्‍या समक्ष सादर केले. तसेच मान्‍यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍या समवेत संवाद साधला. याप्रसंगी वनामकृवि चे कुलगूरू मा डॉ किशनराव गोरे, मा श्री अनिल नखाते, श्री विश्‍वनाथ थोरे, शिक्षण संचालक त‍था अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्राचार्या प्रा विशाला पटनम व महाविद्यालयातील प्राध्‍यापिका उपस्थित होते.