परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांर्गत असलेल्या परभणी कृषि महाविद्यालच्या करडई संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्या
कृषीकन्याच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम व
राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातुन मौजे. जांब ता. जि. परभणी येथे दिनांक 10 जुलै रोजी जनावरांचे लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, डॉ. एस. बी. बैनवाड, पशुवैद्यक डॉ. उमेश लकारे, डॉ. विजयकुमार हतागळे, श्री वायद अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती
होती. यावेळी घटसर्प व फ-या या रोगावरील लस
गावातील साधारणत: 200 जनावरांना देण्यात आली. यावेळी शेतक-यांना डॉ. एस. बी. बैनवाड
यांनी लसीकरणाचे महत्व पटवुन सांगितले तर पशुवैद्यक
डॉ. उमेश लकारे यांनी जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. पपीता गौरखेडे व कार्यक्रम अधिकारी
डॉ. स्वाती झाडे
यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीकन्यांनी परिश्रम घेतले.