Thursday, July 5, 2018

मौजे कुंभकर्ण टाकळी (ता.जि. परभणी) येथे वृक्ष लागवड कार्यक्रम

कृषि दिनाच्‍या पार्श्‍वभुमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गत असलेल्‍या परभणी कृषि महावि़द्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 जुलै रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मौजे कुंभकर्ण टाकळी (ता. जि. परभणी) येथे राबविण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले होते तर डॉ. सी. बी. लटपटे, श्री. पानझाडे, सौ. कुलकर्णी, सरपंच प्रभुभैय्या जयस्वाल, सदाशिव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले मार्गदर्शनांत म्‍हणाले की, हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत असुन हा परिणाम कमी करण्‍यासाठी प्रत्‍येकांनी वृक्ष लागवड व त्‍याचे सवंर्धन केले पाहिजे. डॉ. सी. बी. लटपटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कौस्‍तुभ दिक्षीत यांनी केले तर आभार छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. आशिष बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे कुषीदुत व राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक यांनी परीश्रम घेतले.