Monday, July 2, 2018

प्‍लॉस्टिक पिशव्‍यास पर्यायी उपयुक्‍त कापडी पिशव्‍याची निर्मिती व प्रसार

वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सामाजिक विज्ञान महाविद्यालयतील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागातील विद्यार्थींनी प्‍लॉस्टिक बंदीच्‍या पार्श्‍वभुमीवर पर्यावरणपुरक विविध आकारातील आकर्षक व उपयुक्‍त कापडी पिशव्‍या निर्मिती करण्‍यास सुरवात केली आहे. कृ‍षी दिननिमित्‍त दिनांक 1 जुलै रोजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते या कापडी पिशव्‍याचे विमोचन करण्‍यात आले. यावेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलवडे, डॉ. एन. जी. लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली अभ्‍यासक्रमाचा भाग म्‍हणुन विद्यार्थींनी या पिशव्‍याची निर्मिती करीत असुन विभागात अल्‍प दरात उपलब्‍ध आहेत.