Monday, July 2, 2018

वनामकृवित गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस पोर्टल बाबत प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या नियंत्रक कार्यालयाच्‍या वतीने दिनांक 2 जुलै रोजी शासकीय कार्यालयासाठी खरेदीबाबत शासनाने लागू केलेल्या नवीन ऑन लाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी गर्व्‍हमेंट ई मार्केट प्‍लेस Gem पोर्टल बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते झाले तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांची प्रमुख उ‍पस्थिती होती. सदरिल पोर्टल वर खरेदी करण्याबाबतचे प्रशिक्षण श्री माणिक शिनगारे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नियंत्रक विनोद गायकवाड यांनी केली. या प्रशिक्षणात विद्यापीठातील सर्व आहरण व सवितरण अधिकारी - कर्मचारी मोठया संख्‍येन उपस्थित होते.