वनामकृवितील खेडाळु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरूतत्व म्हणजेच सकारात्मक गुण असतात, हे गुरूतत्व वाढीस लागण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न
करावेत, वाईक गुणांचा त्याग करावा. व्यक्तीमत्वात विकारांचे प्रभुत्व नको, विचारांचे प्रदुषण नको. शेतकरी व विद्यार्थ्यांच्या हिता करिता
आपण सर्व सामुदायिक प्रयत्न करू, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यी
कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरूपौणिमेचे औचित्य साधुन दिनांक २७ जुलै रोजी विद्यापीठ खेडाळू, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव
सोहळाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अधियंता डॉ अशोक कडाळे, विद्यार्थ्यी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडा शिक्षिका डॉ आशा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, गेल्या पाच
वर्षापासुन विद्यापीठाने राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक क्रीडा स्पर्धा व
सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन अतिशय उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे. विशेषत: अश्वमेध
व इंद्रधनुष्य स्पर्धेच्या आयोजनात कोठेही उणिव न ठेवता यशस्वी पार पाडली. भावी
काळात क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकिकासाठी सर्वांनी प्रयत्न
करूया. विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमधील क्रीडा व सांस्कृतिक
कलागुणांना वाव मिळण्याकरिता क्रीडांगण, व्यायामशाळा आदी अद्यायवत सोयी व सुविधा
निर्माण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, गुणगौरव
कार्यक्रमातील विद्यार्थ्याच्या कला व सांस्कृतिक गुणांचे कौतुकामुळे
विद्यार्थ्याना प्रेरणा मिळते. विद्यापीठातील विविध
महाविद्यालयात अनेक प्रतिभावंत विद्यार्थ्यी असुन त्यांच्यातील कला व सांस्कृतिक
गुणांना वाव देण्याची गरज आहे.
कार्यक्रमात गुरूपौर्णिमे निमित्त कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ महेश देशमुख यांनी मागील
पाच वर्षाचा विद्यापीठाच्या क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची माहिती
दिली तर सुत्रसंचालन श्री सुनिल तुरूकमाने यांनी केले.
गुणगौरव सोहळयात सन २०१७–१८ मध्ये
बेंगलौर येथील कृषि विज्ञान विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय
आंतर कृषि विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम
स्थान प्राप्त केलेल्या विद्यापीठ संघातील शारदा चोपडे, संजिवनी
बारंगुळे, प्राजक्ता चौगुले, राजेश्री भालेराव, अश्विनी वरपे, रजनी टकले, प्रतिक्षा पवार, विशाखा चोपडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. तसेच कबडडी पुरूषांच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त
केलेल्या विद्यापीठ संघातील प्रतीक घाटगे, वैभम डुकरे, हरिकृष्णा, प्रशांत लोहार, योगेश आठवले, श्रीकृष्णा धांडे, योगेश बाबु, विकास शिदोरे आदींचा सत्कार करण्यात
आला तर संजय लोहार यांनी तिहेरी उडीत तृतीय क्रमांक प्राप्त केल्या बाबत सत्कार
केला. सन २०१७–१८ मध्ये तिरूपती येथील श्री व्यंकटेश्वरा पशुवैद्यकीय
विद्यापीठात पार पाडलेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय युवक महोत्सवात
कोलाज स्पर्धेत कृष्णा अनारसे यांनी व्दितीय तर इंद्रधनुष्य मध्ये स्थळचित्र
स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबाबत सत्कार करण्यात आला तसेच रांगोळी
स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केल्याबाबत विद्या ढेपे हिचा सत्कार
करण्यात आला. कुमठा (कर्नाटक) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या
राष्ट्रीय एकात्मता शिबीरात सहभाग नोंदवुन विशेष कामगिरी केल्याबाबत उस्मानाबाद
कृषि महाविद्यालयाचे स्वयंसेवक टी एल भोसले, जी एच जगताप,
ए डी पवार, पी व्ही वागजे, पी जी भोसले, वाय एम जयोथी, एन
एन पतीथी, व्ही डी व्यवहारे, ए डी
पवार, ए व्ही बिराजदार आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आला. विद्यापीठात आयोजित इंद्रधनुष्य स्पर्धेा
यशस्वीतेसाठी कार्य केलेल्या विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांचा देखिल सत्कार
करण्यात आला. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध
घटक व संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी व विद्यार्थ्यां मोठया संख्येने उपस्थित होते.