Saturday, September 12, 2020

वनामकृविच्‍या ब्‍लॉगला आठ वर्ष पुर्ण, आठ वर्षात ब्‍लॉगचे पाच लाख पेक्षा जास्‍त वेळेस वाचन

विद्यापीठाचे युटयुब चॅनेल व फेसबुक पेजलाही चांगला प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने १२ सप्‍टेबर २०१२ मध्‍ये promkvparbhani.blogspot.com हा ब्‍लॉग सुरू करून आज आठ वर्ष म्‍हणजेच शहाण्‍णव (९६महिने पुर्ण झाले. आठ वर्षात हा ब्‍लॉग पाच लाख पेक्षा जास्‍त वेळेस पाहीला व वाचला गेला या वाचकात इतर देशातील वाचकांचाही समावेश आहे. पहिल्‍या चाळीस (४०) महिण्‍यात एक लाख वेळेस वाचन झाले, पुढील केवळ सेहेचाळीस (४६) महिण्‍यात चार लाख वेळेस वाचन झाले, म्‍हणजेचे दर महीण्‍यास साधारणत: आठ हजार पेक्षा जास्‍त वेळेस वाचन होते.

आजपर्यंत विद्यापीठाच्‍या १४१४ बातम्‍या, पोस्‍ट, घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्‍लॉगवर प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या, म्‍हणजेच दर माह १५ पोस्‍ट प्रसिध्‍द होतात. यास वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला, विशेषत: या विविध बातम्‍यास प्रसारमाध्‍यमाच्‍या प्रतिनिधींनी आपआपल्‍या दैनिकात, साप्‍ताहिक, मासिक तसेच इलेक्‍ट्रानिक माध्‍यमात मोठी प्रसिध्‍दी दिली, त्‍यामुळे लाखो लोकांपर्यंत ही सर्व माहिती पोहचण्‍यास मोठी मदत झाली. सदरिल प्रसिध्‍द केलेल्‍या पोस्‍ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्‍ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठ उपलब्‍धी आदींशी संबंधीत आहेत. सदरिल ब्‍लॉगचा शेतकरी बांधव, विद्यार्थी, सामान्‍य नागरीक ही वाचक असुन कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत त्‍वरित पोहोचविण्‍यास मदत होत आहे.

यासोबतच सन २०१२ मध्‍येच विद्यापीठाचे युटयुब चॅनेल http://youtube.com/user/vnmkv तसेच फेसबुक पेज facebook.com/vnmkv/ याची सुरवात करण्‍यात आली. आज विद्यापीठ युटयुब चॅनेलचे पाच हजार पेक्षा जास्‍त सबस्‍क्राईबर झाले असुन ९० पेक्षा जास्‍त व्हिडिओ प्रकाशित करण्‍यात आले. हे व्हिडिओ दीड लाख पेक्षा जास्‍त वेळेस पाहण्‍यात आले असुन साधारणत: साडे सहा लाख पेक्षा जास्‍त मिनिटस पाहण्‍यात आले. विद्यापीठ फेसबुक पेजचे दहा हजार पेक्षा जास्‍त फॉलोवर असुन २,७२,००० पेक्षा जास्‍त जणांनी आजपर्यंत भेटी दिल्‍या आहेत.  

सदरिल विद्यापीठाची सर्व समाज माध्‍यमे अविरत कार्यरत राहण्‍यास विद्यापीठाचे आठ वर्षातील सर्व सन्‍माननीय कुलगुरू, विस्‍तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालकसंशोधन संचालक व कुलसचिव यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्‍साहन लाभले. तसेच विद्यापीठांतर्गत असलेले विविध महाविद्यालयेकृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे व विविध कार्यालये येथील अधिकारीकर्मचारीशास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांचे मोठे योगदान आहे.

गेल्‍या आठ वर्षातील विद्यापीठाच्‍या विविध घडामोडीचा ब्‍लॉग व इतर समाज माध्‍यमे हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी व बातम्‍या छायाचित्रासह आपण पाहु शकतो, हे सर्वांच्‍या सहकार्यामुळेच शक्‍य होऊ शकले. विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद व सहकार्य लाभो, हीच अपेक्षा.


धन्‍यवाद

आपला स्‍नेहांकित

जनसंपर्क अधिकारी, वनामकृविपरभणी