Wednesday, September 9, 2020

वनामकृवितील अधिकारी व कर्मचारी यांना होणार संस्‍थात्‍मक ई मेल आयडीचे वितरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांना नियमित राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवर शिक्षण, संशोधन व प्रशासकीय कामाकरिता डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणी करीता अधिकृत संस्‍थात्‍मक ई मेल आयडीची गरज लागते. या दृष्‍टीने विद्यापीठाच्‍या मध्यवर्ती संगणक केंद्राच्‍या वतीने सदरिल संस्‍थात्‍मक ई मेल आयडीची सुविधा सुरू करण्‍यात आली असुन दिनांक ८ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते वितरणास ई मेल आयडी प्रारंभ करण्‍यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेकुलसचिव श्री रणजित पाटील आदींंची प्रमुख उपस्थित होती. सदरील सुविधा सुरु करण्यासाठी मध्यवर्ती संगणक केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ संतोष फुलारी व ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी प्रयत्न केले.