वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वतीने “सेंद्रिय शेती प्रशिक्षण, सेंद्रीय शेतीमध्ये यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण आणि प्रमाणीकरण” या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 16 ते 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.00 ते 8.30 या वेळेत करण्यात आले आहे. सदरिल कार्यशाळेचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तीन दिवसीय कार्यशाळेत दिनांक 16 सप्टेंबर रोजी “सेंद्रीय शेती प्रमाणीकरण व विक्री व्यवस्थापन” यावर सेंद्रीय प्रमाणीकरण तज्ञ श्री बाळासाहेब खेमनर मार्गदर्शन करणार असुन दिनांक 17 सप्टेंबर रोजी “सेंद्रीय शेतीमध्ये बैलचलित अवजारांचा कार्यक्षम वापर” यावर पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी या मार्गदर्शन करणार आहेत तसेच दिनांक 18 सप्टेंबर रोजी “मृद व जलसंधारण: सेंद्रीय शेतीचा आत्मा” यावर कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरिल कार्यशाळेत जास्तीत जास्त शेतकरी बांधव, शेतकरी महिला, शेतकरी युवक-युवती यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. सौ. पपीता गौरखेडे, डॉ. सौ. अनुराधा लाड, डॉ. सुनिल जावळे आदी केले आहे. प्रत्यक्ष झुम मिटिंग मध्ये सहभागी होण्याकरिता झुम आयडी 92868513731 व पासवर्ड 123456 या वापर करावा. अधिक माहितीसाठी डॉ. पपीता गोरखेडे (8007745666), डॉ. अनुराधा लाड (9860859399), डॉ. सुनील जावळे (9422111061) यांच्याशी संपर्क करावा.