Sunday, September 13, 2020

मृदाआरोग्य व उत्पादन वाढीसाठी हवामान स्मार्ट तंत्राचा वापर करणे गरजेचे ……. कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण

वनामकृवित हवामान स्मार्ट कृषि क्षेत्रासाठी मातीचे आरोग्यया विषयावर ऑनलाईन व्याख्यान मालेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा-परभणी, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्‍या वतीने हवामान स्मार्ट कृषि क्षेत्रासाठी मातीचे आरोग्य व्यवस्थापीत करण्याच्या दृष्टीकोनातून नविन मार्गया विषयावर दिनांक ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन व्याख्यान मालेचे आयोजन करण्‍यात आले असुन या व्‍याख्‍यान मालेचे उदघाटन दिनांक सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली. व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी गुंफले.  याप्रसंगी प्रमुख अतिथी भोपाल येथील भारतीय मृद विज्ञान संस्थाचे संचालक डॉ. ए. के. पात्र आणि नागपुर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भुमी उपयोग नियोजन संस्‍थेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल यांची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी कृषि क्षेत्रातील हवामान स्मार्ट तंत्राचा वापर शेतक­यांचे उत्पादन वाढीसाठी शाश्वत शेती पद्धती, विविध हवामान निगडीत पिक पद्धती तसेच वनामकृवि संशोधन तंत्रांचे बदलत्या हवामानानुसार होणारे परिणाम या विषयी सखोल सादरीकरणाद्वारे विवेचन केले.

डॉ. पाल यांनी मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग यासाठी हवामानाशी निगडीत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, मृदाजनक प्रक्रियेमुळे तयार होणारी माती याचा शाश्वत शेतीसाठी होणारा फायदा यावर संशोधन करणे गरजेचे आहे. तसेच डॉ. ए.के. पात्र यांनी भविष्‍यातील हरित क्रांती ही मृद संसाधनामधील व्यवस्थापनामुळे होईल असा विश्वास व्यक्त केला.

व्‍याख्‍यान मालेच्‍या आयोजनाची भुमिका संयोजक अध्यक्ष, भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा-परभणीचे अध्‍यक्ष तथा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांनी स्पष्ट केली. प्रास्तावीक भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा-परभणीचे सचिव आयोजक डॉ. प्रविण वैद्य यांनी केले तर डॉ. स्वाती झाडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सुत्रसंचालन सहआयोजक डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. व्‍याख्‍यान मालेत देशातुन व विदेशातुन ३५५ प्रशिक्षणार्थ्‍यांनी यात सहभाग नोंदविला. दिनांक ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन व्याख्यान मालेत प्रत्येक शनिवारी दुपारी ठिक ३.०० वाजता देशातील नामांकित संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल, डॉ. एस.पी. वानी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी. चंद्रशेखर राव, डॉ. च. श्रीनिवास राव, डॉ. डीएलएन राव, डॉ दिपक रंजन बिसवास, डॉ. देबाशीस चक्रबोर्ती, डॉ. जी रविंद्र चारी, डॉ. टी. भट्टाचार्य, डॉ. सुरेश कुमार चौधरी आदींचे विविध विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रम यशस्वीततेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. स्नेहल शिलेवंत व डॉ. शशिशेखर जावळे आदींनी सहकार्य केले.