Saturday, July 3, 2021

बालकांच्‍या सर्वांगिण विकासाकरिता प्रत्येक घर शाळा होणे आवश्यक…… प्राचार्या डॉ. जया बंगाळे

कोरोना प्रकोपाचा सामना करण्यासाठी शेतकरी कुटुंबाचे सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिनी दिनांक १ जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र, परभणी आत्मा विभाग आणि उस्‍मानाबाद येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रकोपाचा सामना करण्यासाठी शेतकरी कुटुंबाचे सक्षमीकरण कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अथिती म्‍हणुन आत्मा प्रकल्प संचालक श्री.के.आर सराफ हे उपस्थित होते तर प्राचार्या डॉ. जया बंगाळे, कृषि विज्ञान केद्राचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ इंजि.सचिन सूर्यवंशी, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. बलवीर मुंडे आदींची प्रमुख उपस्थ्‍िाती होती.

मार्गदर्शनात श्री के आर सराफ यांनी महिला करिता असलेल्‍या विविध कृषि योजनांची माहिती देवून योजनांचा महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तर प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांनी गर्भधारणेपासून ते वयाच्या आठ वर्षापर्यंत सर्वांगीण विकास होण्यासाठी पालकांनी काळजी घ्यावी तसेच कोरोना परिस्थीतीत “प्रत्येक घर शाळा” व्हावी असे सांगितले.

इंजि.सचिन सूर्यवंशी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवत असलेले विविध उपक्रम नमूद केले.तर जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. बलवीर मुंडे यांनी कोरोना संकटात हिमतीने तोंड देण्यासाठी महिलांना अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले.

वेबिनार मध्‍ये महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकांनी सहभागी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. अन्न विज्ञान व पोषण विभागाच्या प्रमुख डॉ.नाहिद खान. यांनी आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या याचा वापर वाढवावा त्यासाठी भाज्यांपिठात मिसळून त्याचे धपाटे बनवून खावेत तसेच प्रथिने, जीवनसत्वे यांचा आहारात समावेश होण्यासाठी अन्नपदार्थ सुचविले. काम करताना महिलांचे श्रम बचत कशी करावी या बाबत साधन संपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ.माधुरी कुलकर्णी यांनी उपयुक्त तंत्रज्ञान सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाची आर्थिक घडी कोलमडलेली असुन महिलांना भरतकाम, विणकाम, वारली, रंगकाम आदी माध्यमाद्वारे गृहउद्योगाचे घडे वस्त्र व परिधान विभागाच्या प्रमुख प्रा..मेधा उमरीकर यांनी दिले. ग्रामीण मुलींच्या भविष्याकरिता शिक्षणाचे महत्व यावर डॉ.वीणा भालेराव यांनी मार्गदर्शन केले तर विषय विशेषज्ञ प्रा.वर्षा मारवाळीकर यांनी महिलांनी कोरोना परिस्थितीत सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.जी. पुरी यांनी केले तर आभार डॉ.व्हि.एस.मनवर यांनी मानले. ऑनलाईन माध्यमाद्वारे घेतलेल्या या कार्यक्रमास शेतकरी कुटुंबियांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. जया बंगाळे याच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. जी. पुरी , डॉ. व्हि. एस. मनवर, प्रा.वर्षा मारवाळीकर आदींनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा मारवाळीकर, शितल मोरे, रविकुमार, रामदास शिंपले आदींनी परिश्रम घेतले.