Friday, July 2, 2021

हरित विद्यापीठासाठी सरसावले वनामकृविचे माजी विद्यार्थी

परभणी कृषि महाविद्यालयाचे सन १९८१ बॅचच्‍या माजी विद्यार्थी दिले दिड लाख रूपयाचा निधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा स्‍वच्‍छ परिसर, हरित परिसर व सुरक्षीत परिसर या संकल्‍पनेतुन हरित विद्यापीठासाठी विद्यापीठ परिसर व मराठवाडयातील विद्यापीठांर्गत असलेल्‍या प्रक्षेत्रावर यावर्षी मोठया प्रमाणात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिम गेल्‍या तीन वर्षापासुन राबविण्‍यात येत आहे.  दिनांक १ जुलै रोजी कृषि दिनी महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जयंती आणि विद्यापीठ स्‍थापनेचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन परभणी कृषि महाविद्यालयाचे सन १९८१-८२ बॅचचे माजी विद्यार्थींनी मिळुण एकत्रित केलेला एकुण दिड लाख रूपयाचा निधी विद्यापीठाच्‍या वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन उपक्रमास दिला. सदरिल कार्यक्रमास परभणी जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी मा श्री दिपक मुगळीकर यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. यावेळी माजी विद्यार्थी मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार, माजी विद्यार्थी अतिरीक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, जिल्‍हा वनअधिकारी श्री पी सी वाघचौरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यापीठ वृक्षलागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, माजी विद्यार्थी श्री हरिश्‍चंद्र झनझन, डॉ निलकंठ डाके, डॉ किरण अष्‍टपुत्रे, श्री नंदकुमार चव्‍हाण, डॉ जे ई जहागिरदार  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्‍हाधिकारी मा श्री दिपक मुगळीकर म्‍हणाले की, पर्यावरण संतुलनाकरिता प्रत्‍येक व्‍यक्‍तींनी वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन केले पाहिजे. विद्यापीठातील माजी विद्यार्थीनी हरित विद्यापीठ उपक्रमास दिलेली मदत म्‍हणजेच विद्यापीठाविषयी आपली कृतज्ञता व्‍यक्‍त करणे होय, याचाच अर्थ हे सर्व माजी विद्यार्थी आपल्‍या विद्यापीठास विसरले ना‍हीत.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, झाडांमध्‍ये आपल्‍या भावना गुंतल्‍यास निश्चितच मानवाचे वृक्षप्रेम वाढीस लागुन वृक्षसंवर्धन होईल. विद्यापीठ परिसर सुंदर, स्‍वच्‍छ व सुरक्षित करण्‍याच्‍या दृष्‍टीने हरित परिसर हे एक पाऊल आहे, यात विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, प्रा़ध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी आदीं योगदान देतच आहेत परंतु विद्यापीठाचे माजी विद्यार्थीही यात सहभाग घेत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे, या सहभागामुळे माझे झाड, माझा परिसर, माझे विद्यापीठ ही भावना वाढीस लागण्यास मदत होणार असल्याचे मत व्‍यक्‍त केले.

माजी विद्यार्थी डॉ निलकंठ डाके आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सन १९८१-८२ बॅचच्‍या साधारणत: दोनशे विद्यार्थींनी मिळुण दिड लाख रूपये निधी एकत्रित करून हरित विद्यापीठ मोहिमेस देतांना अत्‍यंत आनंद होत आहे. विद्यापीठातुन शिक्षण घेऊन अनेक कृषि पदवीधर विविध क्षेत्रात कार्यरत असतांना महाविद्यालयास विसरलेले नाहित. हरित विद्यापीठ मोहिमेत खारीचा वाटा उचलण्‍याची संधी आम्‍हाला मिळाली.

यावेळी परभणी कृषि महाविद्यालयाचे सन १९८१-८२ बॅचचे माजी विद्यार्थीं सर्वांनी मिळुण एकुण दिड लाख रूपयाचा निधीचा धनादेश माननीय कुलगुरू यांना सूपुर्त केले, सदरिल निधी संकलित करण्‍याकरिता १९८१-८२ बॅचचे माजी विद्यार्थीं लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए पी सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला, साधारणत: दोनशे माजी विद्यार्थी त्‍यास भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ हिराकांत काळपांडे यांनी सांगितले की, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी लागणारे ठिंबक सिंचन संच व इतर साहित्‍याची खरेदी करण्‍यात आली आहेत. सुत्रसंचालन डॉ मीना वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जयकुमार देशमुख, डॉ एस एल कल्‍याणकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 



माजी विद्यार्थी डॉ निलकंठ डाके मनोगत व्‍यक्‍त करतांना

वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी लागणारे ठिंबक सिंचन संच व इतर साहित्‍याची खरेदी करण्‍यात आली