Thursday, July 1, 2021

कृषि दिनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात वृक्षलागवड व वृक्षांचा वाढदिवस साजरा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व वसंतराव नाईक जयंती निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्‍या वतीने दिनांक 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच मागील वर्षी लागवड केलेले व जोमदार वाढ झालेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन केले. मार्गदर्शनात प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांनी सर्वानी वृक्षलागवडी व वृक्ष जोपासण्याचे आवाहन केले. अंतर्गत करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. नाहीद खान, डॉ. माधूरी कुलकर्णी, प्रा.मेधा उमरीकर, डॉ.शंकर पुरी, डॉ.सुनिता काळे, प्रा.निता गायकवाड, डॉ.वीणा भालेराव, डॉ.फरजाना फारुखी, डॉ. इरफाना सिद्दीकी, डॉ. जयश्री रोडगे, व कार्यक्रम अधिकारी डॉ.विद्यानंद मनवर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका तथा महाविद्यालयाचे रोपवाटीका सहाय्यक श्री. रमेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.