Monday, September 5, 2022

देशाच्‍या राजपत्रात वनामकृविच्‍या तीन पिक वाणांचा समावेश

केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या तीन पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला असुन याबाबत दिनांक ३१ ऑगस्‍ट, २०२२ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली आहे. यात विद्यापीठ विकसित करडई पिकांच्‍या पीबीएनएस १८४, देशी कापसाच्‍या पीए ८३७  तसेच खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍ती वाणांचा समावेश आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली. 

देशाच्‍या राजपत्रात वनामकृविच्‍या तीन पिक वाणांचा समावेश केल्‍याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी सर्व संबंधित शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले. या तीन वाणातील करडई पिकांच्‍या पीबीएनएस १८४ वाणास महाराष्‍ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशतामिळनाडु, तेलगंणा आदी राज्‍याकरिता तर देशी कापसाच्‍या पीए ८३७ या वाणाची आंध्र प्रदेशतेलंगणाकर्नाटक आणि तामिळनाडू राज्‍यात विक्रीसाठी प्रसारण करण्‍याची मान्‍यता देण्‍यात आली तसेच खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍ती वाणास महाराष्‍ट्र राज्‍यात प्रसारणाची मान्‍यता प्राप्‍त झाली. यामुळे सदरील वाणांचे बीजोत्पादन हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येते असुन आणि या वाणांचा प्रचार व प्रसार महाराष्ट्रासह बाहेरील राज्यात मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होणार आहे.  सद‍र राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४०६५  अ हा आहे.



Three crop varieties of VNMKV notified in the Gazette of India

According to the Central Seeds Act, 1966, the Government of India, after consultation with the Central Seed Committee, three crop varieties of Vasantrao Naik Marathwada Agricultural University (VNMKV), Parbhani notified in the Gazette of India. In this regard, the Ministry of Agriculture and Farmers Welfare has published a notification on 31st August, 2022. The notification number of the Gazette is SO 4065. This notification includes safflower crop variety PBNS-184, sorghum variety Parbhani Shakti (PKV-1009) and desi cotton cotton variety PA-837 developed by the university (VNMKV, Parbhani), said Director of Research (VNMKV) Dr.D.P.Waskar. Hon'ble Vice-Chancellor of the University Dr. Indra Mani congratulated all concerned scientists who contributed for development of these three varieties of the University. 

As per notification, PBNS-184 varieties of safflower recommended for sale in Maharashtra, Karnataka, Andra Pradesh, Telangana state, and desi cotton variety PA-837 recommended for sale in Andra Pradesh, Telangana, Karnataka, Tamil Nadu while sorghum variety Parbhani Shakti (PVK-1009) is recommended for sale in Maharashtra. With this notification, the quality of the seeds of these varieties can be regulated and these seeds shall be sold for the purpose of agriculture in the recommended states.